"स्वच्छता ही सेवा" या उपक्रमाद्वारे जनप्रबोधन...

पिंपरी ( सह्याद्री बुलेटीन) - शहर विकास मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या अनुषंगाने आणि स्वच्छ भारत अभियान नागरी च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमाद्वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवार, दि. 21 रोजी सकाळी 11:30 वाजता जनप्रबोधन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 
यावेळी क्षेत्रीय अधिकारी विजय खोराटे, मुख्य आरोग्य निरीक्षक श्री राम गायकवाड, मा. वडगामा तसेच सर्व आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, 73 सोसायट्यांचे 146 प्रतिनिधी आणि खत निर्मितीसाठी मशिनरी पुरविणाऱ्या 14 कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.
 
ड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात, गृहनिर्माण संस्थांनी ओला व सुका कचरा वेगळा करून, ओल्या कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया करून, खत निर्माण करणे. याविषयी प्रबोधन या बैठकीमध्ये करण्यात आले.
"स्वच्छता ही सेवा" या उपक्रमाद्वारे जनप्रबोधन...

Review